विनय हर्डीकर या एक शिक्षकी ‘मुक्त-विद्यापीठा’त मी ‘लिबरल एज्युकेशन’चा एक दीर्घ कोर्स करत आहे… ‘साकल्य प्रदेशा’ची मुशाफिरी अशी त्याची पद्धत आहे…
या आठवड्यात विनयची पंचाहत्तरी पुण्यात दोन दिवस साजरी झाली. मुलाखतीत ठरल्याप्रमाणे तुम्ही यांना का सोडलं, त्यांना का सोडलं, तिथंच का नाही राहिलात, असे प्रश्न विचारले जातात. दोन दिवस मित्रपरिवारांनी गच्च भरलेलं सभागृहं, प्रत्येकाला त्याच्याशी वाटणारा स्नेह आणि उल्लेखली जाणारी कामांची, विचारांची विविध क्षेत्रं पाहून खरं तर विचारायला हवं होतं की, हे सारं कसं जोडलं?.......